Suspicious Bag Found in Delhi : राजधानी नवी दिल्लीमध्ये घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. राजधानीतील ओल्ड सीमापुरी (Old Seemapuri) परिसरात गुरुवारी दुपारी एका संशयस्पद बॅगमध्ये IED आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. नवी दिल्लीचे स्पेशल सेल आणि बॉम्ब शोधक पथकाने माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. तसेच घटनेचं गांभिर्य ओळखून एनएसजी पथकही पोहचले. या प्रकरणाचा सध्या तपास करण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीतील ओल्ड सीमापुरी परिसरातील एका घरात गुरुवारी दुपारी संशयस्पद बॅग (Suspicious Bag) आढळली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. याची सूचना दिल्ली पोलिसांना तात्काळ देण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलीस, स्पेशल सेल आणि एनएसजी घटनास्थळी दाखल झाले. संशयस्पद बॅगमधून आयइडी जप्त करण्यात आले. ज्या घरात संशयस्पद बॅग आढळली ते कासिम नावाच्या व्यक्तीचे होते. कासिमने काही दिवसांपूर्वी प्रॉपर्टी डीलर शकीलच्या मदतीने घराचा दुसरा मजला भाड्याने दिला होता.
दहा दिवसांपूर्वी या तीन मुले राहण्यासाठी आले होते. पोलीस पोहचण्यापूर्वी सर्वजण बॅग घरातच सोडून पसार झाले. गुरुवारी दुपारी दोन वाजता पोलिसांना संशयस्पद बॅगबद्दल माहिती मिळाली होती. स्पेशल सेलच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही संशयस्पद बॅग ओल्ड सीमापुरी परिसरातील घर क्रमांक डी-49 मिळाली. दरम्यान, दिल्लीमधील गाजीपूर परिसरात काही दिवसांपूर्वीच RDX मिळाले होते. याचा तपास करत असताना स्पेशल सेल सीमापुरी परिसरातील या घरात पोहचली होती. तपासादरम्यान संशयस्पद बॅग आढळली. ही बॅग पॅक केलेली होती. एनएसजी पथकाडून याचा तपास केला जात आहे.
गेल्या महिन्यात आढळली होती RDX ने भरलेली बॅग -
14 जानेवारी 2022 रोजी गाजीपूर भाजी मंडई गेट क्रमांक एकच्या बाहेर एक बॅग मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक एकच्या बाहेर अनुपमने आपली स्कुटी पार्क केली होती. त्याच जागी RDX ने भरलेली बॅग आढळली होती. पोलिसांना या बॅगबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ भाजी मंडईकडे धाव घेतली होती. त्यानंतर आठ फूट लांब खड्डा करण्यात आला. एनएसजी पथकाने ती बॅग त्या खड्ड्यात ठेवली होती. थोड्यावेळानंतर मोठा स्फोट झाला होता.