इंदूर : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. इंदूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्वत: सुषमा स्वराज यांनी ही घोषणा केली. या निर्णयाची माहिती पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना दिल्याचं स्वराज यांनी सांगितलं.
सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातील खासदार आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे सुषमा स्वराज आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरु होती. अखेर आज स्वत:च त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवू शकतं, असंही म्हटलं जात आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेक वेळा त्यांना रुग्णालयातही दाखल व्हावं लागलं होतं. परंतु मंत्री म्हणून त्या कायमच त्याचं काम करत होत्या.
सुषमा स्वराज सध्या मध्य प्रदेशात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या भाजपचा प्रचार करत आहेत.