जम्मूवरुन दोन अतिरेकी दिल्लीकडे निघाले?
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2016 10:57 AM (IST)
नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशात घातपाताची शक्यता लक्षात घेता, अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच जम्मू काश्मीरमध्ये घुसलेले दोन अतिरेकी दिल्लीकडे निघाल्याची माहिती मिळत आहे. खाजगी वाहनाने हे अतिरेकी दिल्लीकडे कूच करत आहेत. हे दहशतवादी दिल्लीत घातपात घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक टोल, मेट्रो स्टेशन आणि खाजगी वाहनांची कसून चौकशी सुरु आहे. होय, सर्जिकल स्ट्राईक झाला : पाक सुरक्षातज्ज्ञ दरम्यान, भारतीय राजकारण्यांकडून सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांविषयी विचारणा होत असतानाच, पाकिस्तानच्या सुरक्षातज्ज्ञ आयशा सिद्धिका यांनी सर्जिकल स्ट्राईकला दुजोरा दिला आहे. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सिद्धिका यांनी एबीपीशी बोलताना स्पष्ट केलं.