Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज आज बीसीसीआयच्या (BCCI) याचिकेवर सुनावणी होणार आहे.. या याचिकेत बीसीसीआयने आपल्या संविधानात काही बदलांची परवानगी मागितली आहे. कोर्टाने बीसीसीआयची याचिका मान्य केली तर अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढवता येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) याचिकेवर 13 सप्टेंबर म्हणजेच आज सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले.
आज दुपारी या प्रकरणाची सुनावणी होणार
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने बीसीसीआयतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले की, ते या प्रकरणाची तसेच क्रिकेट बोर्डाच्या कामकाजाशी संबंधित इतर बाबींची सुनावणी मंगळवारी दुपारी करतील.
'कूलिंग-ऑफ' कालावधी
बीसीसीआयने आपल्या प्रस्तावित दुरुस्तीमध्ये, आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी 'कूलिंग-ऑफ' कालावधी संपवण्याबाबत नमूद केले आहे, ज्यामुळे सौरव गांगुली आणि जय शहा यांना संबंधित राज्य क्रिकेट संघटनांमध्ये सहा वर्षे पूर्ण होऊनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून काम चालू ठेवता येईल.
अर्ज जमा करण्याच्या सूचना
वरिष्ठ अधिवक्ता पीएस नरसिंह यांना न्यायाधीश म्हणून बढती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांची या खटल्यात अॅमिकस क्युरी (न्याय मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायालयाने सिंग यांना संबंधित अर्ज गोळा करून न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले आहे.
गांगुलीचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपत आहे
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहुल गांगुलीचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. ते बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे पदाधिकारी देखील आहेत, तर शाह बीसीसीआयपूर्वी गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये पदाधिकारी होते.