नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बहाल केलेला 'भारतरत्न' हा सन्मान काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे.
देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचा कथितरित्या गैरवापर केल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. मात्र न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठाने तेंडुलकरवरील आरोपांसाठी कुठलेही नियम किंवा कायदे नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
अनेक लेखकांनी त्यांच्या पुस्तकात तेंडुलकरचा उल्लेख भारतरत्न असा केला आहे. पुस्तकाचं शीर्षकही त्यांनी अशाप्रकारे ठेवलं आहे. त्याचप्रमाणे सन्मानानंतरही व्यावसायिक जाहिराती करणं सुरु ठेवल्याचं याचिकाकर्ते वी. के. नास्वा यांनी म्हटलं आहे.
जर तिसऱ्या व्यक्तीने तेंडुलकर यांचा उल्लेख 'भारतरत्न' असा केला असेल, तर त्यासाठी सचिनला जबाबदार ठरवण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आहे.