नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संटकाटामुळे देशभरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झालंय. त्यात सोशल मीडियातून पसरत असलेल्या खोट्या बातम्यांमुळे त्यात अधिक भर पडत आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने 31 मार्चला न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनला काही आदेश दिले होते. या आदेशाचा स्वीकार न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनने केला असून माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभारही मानले आहे. न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी याविषयी प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच देशात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने लोक भयभीत झाले आहेत. त्यात कहर म्हणजे सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने 31 मार्चला न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनला या संदर्भात काही आदेश दिले. यात खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले आहे.
तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी
सुप्रीम कोर्टाचे आभार
सोशल मीडियात पसरणाऱ्या खोट्या बातम्या आणि कोरोना विषायीच्या अन्य शंका दूर करण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी माध्यमांना याची मदत होणार आहे. यासाठी केंद्र सरकार रोज बुलेटीन सादर करणार आहे. यावेळी माध्यमांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल एनबीने सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. साथीच्या आजारांबद्दल स्वतंत्रपणे चर्चा, वादविवाद आणि कव्हरेजमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला हेतू नसल्याचे सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले. एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी यासंदर्भात प्रसिद्दी पत्रक जारी केलं आहे.
PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई
कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावरुन याविषयी मोठ्या प्रमाणात अफवा पसरताना दिसत आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. यापुढे सोशल मीडिया किंवा कोणत्याही माध्यमातून अफवा किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढत आहे. आत्ताच्या घडीला देशात 1723 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 38 जणांना आतापर्यंत यात जीव गमवावा लागला आहे. तर, 151 लोक यातून सहीसलामत बरे झाले आहे.
Nizamuddin Markaz | दिल्लीत जमावबंदी असतानाही मरकजमध्ये शेकडोजण, व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती