नवी दिल्ली: कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

काँग्रेस आणि जेडीएसनं येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. बुधवारी मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत ऐतिहासिक सुनावणीनंतर, कोर्टाने येडियुरप्पा यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला होता.

मात्र त्याचवेळी सर्वोच्च न्यायालायाने भाजपला समर्थक आमदारांची यादी जाहीर करण्यास सांगितलं आहे. त्याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

येडियुरप्पा यांनी गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपनं सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा दावा केला आहे. त्यासाठी भाजपला 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसनं येडियुरप्पांच्या शपथविधी होण्यावर स्थगिती आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती त्यावर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी करणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे.

न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.

कोर्टाने समर्थक आमदारांची यादी मागितली
शपथविधी रोखण्यास नकार देऊन कोर्टाकडून भाजपला दिलासा मिळाला असला तरी भाजपचा मार्ग सुकर झाला असं नाही. कारण, कोर्टानं भाजपकडून समर्थक आमदारांची यादी मागितली आहे.  त्याबाबत उद्या पुन्हा साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.  त्यामुळे भाजप बहुमताचा आकडा कशा पद्धतीनं जुळवणार हा ही एक प्रश्न आहे.

कर्नाटकात बहुमताचा आकडा 112 इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे. 

येडियुरप्पांची शपथविधी

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली.

केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 15 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे.  जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.

येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी येडियुरप्पा ऑक्टोबर 2007 मध्ये केवळ 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 37

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

संबंधित बातम्या

कर्नाटक : बहुमत सिद्ध करताना आकड्यांची जुळवाजुळव कशी असेल?

...तेव्हा 7 दिवसातच येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपद गमावलं होतं!

एकट्या येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान!

कर्नाटक सत्तासंघर्ष : रात्री 2 वाजता सुप्रीम कोर्टात काय झालं?

सुप्रीम कोर्टात पहाटे पाचपर्यंत सुनावणी, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील!