नवी दिल्ली : जगातलं आठवं आश्चर्य असलेल्या ताजमहलवर हक्क सांगणाऱ्या उत्तर प्रदेशच्या सुन्नी वक्फ बोर्डाला सर्वोच्च न्यायालयानं चांगलंच झापलं आहे.
'ताजमहलवर हक्क हवाय तर आधी शहाजहाँची सही असलेली कागदपत्रे सादर करा,' अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने आज वक्फ बोर्डाला सुनावलं
'ताजमहल वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, यावर देशात कोण विश्वास ठेवेल? अशा प्रकारची प्रकरणे न्यायालयात आणून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका,' असं म्हणत न्यायालयानं संताप व्यक्त केला.
२००५ मध्ये उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने ताजमहल वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचं घोषित केलं होतं. भारतीय पुरातत्व विभागाने वक्फ बोर्डाच्या या निर्णयाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याच्या सुनावणीदरम्यान आज सुप्रीम कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्डाला सुनावलं.
ताजमहलवर हक्क सांगणाऱ्या सुन्नी वक्फ बोर्डाला सुप्रीम कोर्टाने झापलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Apr 2018 10:41 PM (IST)
'ताजमहलवर हक्क हवाय तर आधी शहाजहाँची सही असलेली कागदपत्रे सादर करा,' अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने आज वक्फ बोर्डाला सुनावलं
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -