“एकवेळ राज्यांना सीईटीची परवानगी देऊ, मात्र खासगी संस्थांना नाही”
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2016 11:52 AM (IST)
नवी दिल्ली : नीटसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही, मात्र शासकीय कॉलेजातल्या प्रवेशासाठी सीईटीला परवानगी देण्यास सुप्रीम कोर्ट सकृतदर्शनी तयार असल्याचं दिसलंय. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानं आज कोर्टात राज्यांच्या सीईटीना शासकीय कॉलेजातल्या प्रवेशासाठी नीटमधून सवलत देण्यास आम्ही तयार आहोत असं सांगितलं. सुनावणी संपवताना कोर्टानंही केंद्राचं मत असेल, तर राज्यांना आम्ही नीटमधून वगळू, मात्र खासगी कॉलेजेस, संस्थांना कुठल्याही परिस्थितीत ही सवलत देणार नाही असं म्हटलंय.