नवी दिल्ली: अनुदानित गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात 5.57 रुपये वाढ झाली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर (एलपीजी) 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

दरम्यान, याबरोबरच विमान इंधन (एटीएफ)च्या दरामध्ये देखील जवळजवळ पाच टक्के कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. याआधी एक मार्च आणि एक फेब्रुवारीला विमान इंधनात वाढ करण्यात आली होती. मात्र, आता पाच टक्के घट करण्यात आल्यानं विमान प्रवास स्वस्त होणार आहे.

* या बरोबरच विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 14.50 रुपयांची कपात केली असल्यानं आता 737.50 रुपयांऐवजी 723 रुपये मोजावे लागणार आहेत.

* तर अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 5.57 रुपयांची वाढ केल्यानं आता त्यासाठी 440.05 रुपये मोजावे लागणार आहेत.

1 मार्च 2017ला विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर 86 रुपयांनी महागला होता:

विनाअनुदानित गॅस सिलेंडरची दरवाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ ठरली होती. याआधी 1 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरचे दर 66.50 रुपयांनी वधारले होते. विनाअनुदानित 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरचे दर त्याआधी 650.50 रुपये होते.

तर सप्टेंबर 2016 मध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 466.50 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या दरात सहा वेळा वाढ करण्यात आली आहे. सप्टेंबर 2016 नंतर आतापर्यंत एलपीजी सिलेंडर 58% म्हणजेच 271 रुपयांनी महागला होता.

मात्र आता विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 14.50 रुपयांची घटे केल्यानं ग्राहकांना काहिसा दिलासा मिळणार आहे.
याआधी तेल कंपन्यांनी अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही 13 पैशांची किरकोळ वाढ केली होती. याआधी 1 फेब्रुवारीमध्ये अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 9 पैशांची वाढ करण्यात आली होती. दोन किरकोळ वाढीच्या आधी अनुदानित गॅस सिलेंडरचे दर 8 वेळा वाढले असून, प्रत्येक वेळी किमान 2 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र आता थेट 5.57 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
यासोबतच तेल कंपन्यांनी विमान इंधनाचे दरही 214 रुपये प्रति किलोलिटर वाढवले होते, त्याचा दर 54,293.38 रुपये झाला होता. यापूर्वी 1 फेब्रुवारी विमान इंधनाच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ केली होती. मात्र, आता थेट 5 टक्क्यांनी यामध्ये कपात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

 

विनाअनुदानित सिलेंडर महागला, नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू

नववर्षात गॅसचा भडका, विनाअनुदानित सिलेंडर महाग