नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टचे प्रसिद्ध वकील आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते यांच्या वादग्रस्त ट्वीटमुळे त्यांची चांगलीच गोची झाली आहे. त्याच्याविरोधात आता लखनऊमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.


उत्तर प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते जीशान हैदर यांनी भूषण यांच्या ट्वीटवर आक्षेप घेत, हजरतगंज कोतवाली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच प्रशांत भूषण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



प्रशांत भूषण यांनी रविवारी श्रीकृष्णाची तुलना रोमिओसोबत केली. यानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका होत होती. प्रशांत भूषण यांच्या या वादग्रस्त ट्वीटनंतर उत्तर प्रदेशमधील विश्वभद्र पुजारी पुरोहित महासंघाच्या पुजाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्याविरोधात यावेळी घोषणाबाजी ही करण्यात आली.


तर दुसरीकडे भूषण यांच्या ट्वीटला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उत्तर दिलं आहे. संबित पात्रा यांनी आपल्या ट्वीट करुन, ''भगवान श्रीकृष्णाला समजून घेण्यासाठी त्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील. त्यांनी सहज श्रीकृष्णाला राजकारणात ओढलं आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे.''



ट्वीटरचा वाद अधिकच चिघळत असल्याने, प्रशांत भूषण यांनी यावर आपलं स्पष्टीकरण दिलंय. भूषण यांनी आणखी एक ट्वीट करुन म्हणलं आहे की, ''अॅन्टी रोमिओ स्क्वॉड संदर्भातील माझ्या ट्वीटचा चुकीचा अर्थ काढला जात आहे.  माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की, अॅन्टी रोमिओ स्क्वॉडसंदर्भात जो तर्क लढवला जात आहे, त्यानुसार भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा काही वेगळी नव्हती.''

मात्र, प्रशांत भूषण यांच्या या वादग्रस्त ट्वीटमुळे नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

संबंधित बातम्या

'रोमिओ नव्हे तर श्रीकृष्ण महिलांची छेड काढत असे'