नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे परदेशी बँकांमध्ये खाते असल्याचा दावा भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. स्वामी यांनी परदेशातील दोन शहरांची नावंही जाहीर केली आहेत. स्वामी यांच्या दाव्यानुसार, हेलिकॉप्टर व्यवहारात सोनिया गांधी यांनाही लाच मिळाली आहे आणि लाच म्हणून मिळालेले पैसे याच परदेशी बँकांमध्ये आहेत. शिवाय, काँग्रेसचे बडे नेतेही या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जातील, असे स्वामी म्हणाले.

 

काय आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा?


 

भारतीय हवाई दलाने 2010 मध्ये इटलीच्या ऑगस्टा या कंपनीकडून 3600 कोटी रुपयात 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदीचा करार केला. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार होतं. तर हवाई दलाचे प्रमुख एस पी त्यागी होते.

 

या व्यवहारासाठी कमीशनरुपी 10 टक्के म्हणजे सुमारे 350 कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असं सांगण्यात येतं.

 

या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता.

 

भारताने हा व्यवहार ‘ऑगस्टा वेस्टलँड’ या कंपनीसोबत केला होता आणि हेलिकॉप्टर बनवणारी कंपनीच नाव ‘फिनमेक्कनिका’ आहे.

 

इटलीच्या ‘फिनमेक्कनिका’ कंपनीने 12 ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या सौद्यापोटी माजी वायूसेना प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईंकाना लाच दिल्याचा आरोप आहे.

 

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरने टेंडर मिळावं यासाठी अटी-शर्ती शिथील केल्याचाही आरोप आहे. त्यामुळेच या कंपनीला हे टेंडर मिळाल्याचं सांगण्यात येतंय. ही लाच ‘फिनमेक्कनिका’ कंपनीकडून दिली होती.

 

माजी वायूसेना प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईंकाना लाचेची रक्कम दिल्याचा आरोप आहे.

 

लाच रक्कम थेट न देता, दोन कंपन्या ‘आयडीएस ट्यूनिशिया’ आणि ‘आयडीएस इंडिया’ यांच्या माध्यमातून देण्यात आल्या.