अलीगड : अलीगड मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच 24 तासांच्या आत यावर स्पष्टीकरण देखील मागितले आहे. उत्तर न दिल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील दिला आहे. विद्यार्थ्यांनी रॅलीसाठी परवानगी घेतली नसल्याचा ठपका विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे.
अलीगड मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या ‘तिरंगा यात्रे’वरून नवा वाद सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांना यात्रेसाठी प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. अशा रॅली विद्यापीठातील शिक्षण आणि शैक्षणिक वातावरणात अडचणी निर्माण करतात, असे नोटिशीत विद्यापीठ प्रशासनाने 24 तासांच्या आत यावर स्पष्टीकरण मागितले आहे. उत्तर न दिल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटिशीत दिला आहे.
विद्यापीठ प्रशासनाला आयोजकांनी पत्र दिले होते. मात्रा प्रशासनाने हे पत्र स्वीकारण्यास नकार दिला होता. आमचे पत्र अशाप्रकारे नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही कँडल मार्च काढणार होतो, त्यावेळी देखील आम्हाला परवानगी नाकारण्यात आल्याचे आयोजक अजय सिंहने सांगितले.
तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 08:12 AM (IST)
अशा रॅली विद्यापीठातील शिक्षण आणि शैक्षणिक वातावरणात अडचणी निर्माण करतात, असे नोटिशीत विद्यापीठ प्रशासनाने 24 तासांच्या आत यावर स्पष्टीकरण मागितले आहे. उत्तर न दिल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटिशीत दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -