मुंबई :  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'सी व्होटर' यांनी केलेलं सर्वेक्षण भाजपसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 233 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 545 जागा असलेल्या लोकसभेत बहुमताचा आकडा 272 आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीएला इतरांची साथ घ्यावी लागेल. यूपीएला 167 जागा मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. मात्र यूपीएने इतरांची साथ घेतली तर बहुमताच्या दिशेने कूच करता येईल.


1. भाजप शिवसेनेने युती करुन लढावं का?

होय - 68.4%

नाही - 28.1 %

सांगता येत नाही - 3.5%

2.   महापालिकांमध्ये विजय मिळवणारा भाजप येत्या निवडणुकांमध्येही यश मिळवेल का?

होय -  50.2%

नाही - 45.3 %

सांगता येत नाही - 4.5%

3.  मोदी लाट आजही आहे का?

होय, काही प्रमाणात  - 26.6%

होय, पण जोर ओसरलाय  - 45.9 %

कधीच नव्हती -  24.3%

सांगता येत नाही - 3.2%

4.  राफेल प्रकरणी खरंच 'चौकीदार चोर आहे' असं म्हणायचं?

सरकार स्वच्छ आहे  - 46.8 %

राफेल व्यवहार संशयास्पद - 33%

सांगता येत नाही  - 20.2%

5.   पुन्हा एनडीए सत्तेत आली, मोदींना पंतप्रधानपद मिळणार नसेल तर नितीन गडकरी सर्वोत्तम पर्याय ठरतील का?

होय - 47.3%

नाही -  46.3 %

सांगता येत नाही - 6.4%

6.  आर्थिक मागासलेला वर्ग आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का?

होय -  66.7%

नाही - 31.1%

सांगता येत नाही - 2.2%

7.  मराठा आरक्षणाच्या मार्गातील कायदेशीर अडचणी दूर करण्यात सरकार यशस्वी ठरेल का?

होय - 59.1%

नाही - 33.2%

सांगता येत नाही - 7.7%

मूड देशाचा : भाजपला धोक्याची घंटा, सेनेला स्वबळाचा फटका बसण्याचा अंदाज

8.  राहुल गांधी आता परिपक्व नेते झालेत का?

ते नेहमीच परिपक्व होते - 7.9%

आता ते परिपक्व झालेत - 33.1%

नाही, ते अपरिपक्वच आहेत  - 54.1%

सांगता येत नाही - 4.9%

9.  राम मंदिराचा वायदा करुनही साधा कायदाही न करणाऱ्या भाजपला मत देणार का?

होय, अन्य कारणांमुळे भाजपलाच मत  - 48.7%

नाही, कायदा नाही केला तर भाजपला मत नाही - 9.6%

नाही, मी भाजपला मत देणारच नाही - 32.1%

सांगता येत नाही  - 9.6%

10. मोदींनी शेतकरी कर्जमाफी केली तर भाजपला फायदा होईल का?

होय, भाजपला खूपच फायदा - 50.7%

होय, काही प्रमाणात - 17.4%

नाही, मुळीच फायदा होणार नाही - 28.6%

सांगता येत नाही - 3.3%

11. शेतकऱ्यांना मासिक वेतन देण्याचा सरकारचा निर्णय योग्य वाटतो का?

चांगली कल्पना, सरकार त्वरित अंमलबजावणी करेल - 37.3%

चांगली कल्पना, अंमलबजावणीबद्दल शंका - 34.2%

वाईट कल्पना - 23.1%

सांगता येत नाही - 5.4%

12. मोदी सरकार तुम्हाला कसं वाटतं?

मोदी आणि सरकार दोन्ही चांगले  - 45.2%

मोदी चांगले नेते, पण सरकार वाईट - 26.6%

मोदी वाईट नेते, पण सरकार चांगले - 3.1%

मोदी आणि सरकार दोन्ही वाईट - 21.9%