नवी दिल्ली : भारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आले नाही, तर भारतासाठी तो फटका असेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड यांनी व्यक्त केले आहे. 'ग्रीड अँड फिअर' या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत नोंदवले आहे.
क्रिस्टोफर वुड्स नेमकं काय म्हणाले?
"पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले नाही, तर भारताला मोठं नुकसान सहन करावं लागेल.", असे म्हणत वुड्स पुढे म्हणाले, "2018 या वर्षात भारताने काही खास कामगिरी केली नाही, मात्र तरी आशियात भारतच वरचढ आहे. भारताच्या आणखी चांगली कामगिरी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती, यावर अवलंबून आहे."
तेलांच्या किंमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भारतासमोरील आव्हानं वाढत आहेत, असेही मत वुड्स यांनी नोंदवले आहे.
भारतीय स्टॉक मार्केटकडूनही वुड्स यांना अजूनही आशा आहेत.
क्रिस्टोफर वुड्स कोण आहेत?
क्रिस्टोफर वुड्स हे CLSA या ब्रोकिंग फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य रणनितीकार आहेत. 'सर्वोत्कृष्ट रणनितीकार' म्हणून जागतिक स्तरावर त्यांना ओळखलं जातं. गुंतवणूकदार नेहमीच आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून असतात. 'ग्रीड अँड फिअर' नावाचं साप्ताहिक सुद्धा क्रिस्टोफर वुड्स प्रसिद्ध करतात.