तामिळनाडू : तामिळनाडूतमध्ये तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी एका महिला पत्रकाराचे गाल थोपटले होते. त्यानंतर राज्यपालांवर बरीच टीकाही झाली होती. या सर्व प्रकारानंतर तामिळनाडूतील भाजप नेत्याने संबंधित महिला पत्रकार आणि मीडिया कर्मचाऱ्यांविषयी फेसबुकवर अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
तामिळनाडूतील भाजप नेता एस व्ही शेखर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर महिला पत्रकारांविषयी फेसबुकवर अतिशय अपमनास्पद कमेंट पोस्ट केली आहे. 'मोठ्या लोकांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याशिवाय कोणीतीही महिला न्यूज अँकर किंवा पत्रकार होऊ शकत नाही.'
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, भाजप नेता एसव्ही शेखर याने आपल्या पोस्टमध्ये लिहंल आहे की, 'ज्या सीनियर महिला पत्रकाराचे गाल राज्यपालांनी थोपटले ती महिला राज्यपालांवर चुकीचे आरोप करत आहे. भाजप सरकारला बदनाम करणं या हेतूनेच तिने हे आरोप केले आहेत.' असं शेखर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'मीडियामध्ये अनेक अशिक्षित लोकं आहेत. राज्यपालांवर आरोप करणारी महिला पत्रकारही याला अपवाद नाही. शैक्षणिक संस्थांपेक्षा मीडिया सेक्टरमध्ये महिलांचं लैंगिक शोषण केलं जातं. महिला पत्रकार पद मिळवण्यासाठी किंवा आपलं एखादं काम करुन काढून घेण्यासाठी मोठ्या लोकांसोबत अनैतिक संबंधही ठेवतात. याला ज्या महिला अपवाद आहेत. त्यांचा मला अभिमान आहे. तामिळनाडू मीडियामध्ये जास्तीत लोक ब्लॅकमेलर्स आहेत.' अशी वादग्रस्त पोस्ट भाजप नेत्याने फेसबुकवर पोस्ट केली होती.
दरम्यान, शेखर यांच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी तात्काळ ही पोस्ट फेसबुकवरुन डिलीट करुन माफीही मागितली.
महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या शेखर यांच्याविरोधात चेन्नईत काही ठिकाणी निदर्शनंही करण्यात आली. त्यामुळे आता शेखर यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
पत्रकार महिलेचे गाल थोपटणाऱ्या राज्यपालांचा माफीनामा
सेक्स फॉर डिग्री वाद: प्रश्न विचारल्यावर राज्यपालांनी महिला पत्रकाराचे गाल थोपटले