गुजरातमध्ये राहुल गांधींच्या कारवर दगडफेक
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2017 04:48 PM (IST)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. गुजरातमधील बनासकांठा इथं राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या आहेत.
गांधीनगर: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. गुजरातमधील बनासकांठा इथं राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या आहेत. इतकंच नाही तर राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले. दरम्यान, भाजपच्या गुंडांनी ही दगडफेक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर काळे झेंडे दाखवणाऱ्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. सध्या गुजरातमध्ये महापुराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत 218 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 61 जण हे बनासकंठातील आहेत. या भागाचीच पाहणी करण्यासाठी राहुल गांधी गेले होते. त्यावेळी हा हल्ला झाला.