चेन्नई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. या निमित्ताने तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये कलाम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.


 
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेही उपस्थित होते.

 
गेल्या वर्षी याच दिवशी मेघालयमध्ये डॉ. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला होता. आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना ते कोसळले आणि त्यांचं निधन झालं. डॉ. कलाम यांचा 1997 मध्ये सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' बहाल करुन गौरव करण्यात आला होता.