कोलकाताः आर्थिक प्रगतीमध्ये सातत्य ठेवायचं असेल तर सरकारने स्वार्थी धोरणांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे, असं सांगत आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक विकास साधण्यासाठी सरकारला कानमंत्र दिला आहे.
सरकारने विकास साधण्यासाठी काय करावं आणि धोरणांमध्ये कसे बदल असावे, याविषयी रघुराम राजन यांनी कानउघाडणी केली आहे. कोलकात्यात आयोजित एका कार्यक्रमात राजन बोलत होते.
सेंट्रल बँकांच्या स्वतंत्रतेचं रक्षण गरजेचं
जगभरातील सरकारने आर्थिक प्रगतीला खोडा घालणाऱ्या योजनांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. सोबतच सेंट्रल बँकांच्या स्वतंत्रतेचं रक्षण केलं पाहिजे. भारतात व्याज दर जास्त असल्यामुळे गुंतवणूक वाढत आहे, हा समज देखील चूकिचा आहे. कारण आर्थिक प्रगतीसाठी मार्केट आणि बँका एकत्र आल्या आहेत, असं राजन यांनी सांगितंल.