मुंबई : देशातील एकेकाळचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचं अस्तित्व सध्या केवळ चार राज्यांमध्ये उरलं आहे. गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या हातातून आणखी एका राज्याची सत्ता गेली. हिमाचल काँग्रेसला गमवावं लागलं, तर गुजरातमध्ये भाजपला मात देण्यात काँग्रेसला अपयश आलं.

भाजप आणि एनडीची सध्या देशातील 29 पैकी 19 राज्यांमध्ये सत्ता आहे. यापैकी 14 राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून विजयरथावर सवार झालेल्या भाजपची विजयी घोडदौड सुरुच आहे.

देशात भाजप कुठे कुठे?

  1. गुजरात

  2. राजस्थान

  3. छत्तीसगड

  4. मध्यप्रदेश

  5. महाराष्ट्र

  6. हरियाणा

  7. गोवा

  8. मणिपूर

  9. झारखंड

  10. अरुणाचल प्रदेश

  11. उत्तराखंड

  12. उत्तर प्रदेश

  13. हिमाचल प्रदेश

  14. आसाम




भाजप आणि एनडीएची राज्य

  1. नागालँड

  2. आंध्र प्रदेश

  3. बिहार

  4. सिक्कीम

  5. जम्मू आणि काश्मीर


काँग्रेसच्या हातात केवळ 4 राज्य

हिमाचल प्रदेश हातातून गेल्यानंतर काँग्रेसकडे आता केवळ 4 राज्य उरली आहेत. यापैकी मिझोराम, मेघालय आणि कर्नाटकमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक होत आहे. तर मोठ्या राज्यांपैकी केवळ पंजाब काँग्रेसकडे आहे. त्यामुळे उर्वरित तीन राज्य वाचवण्याचं आव्हान येत्या काळात काँग्रेसपुढे असेल.

  1. कर्नाटक

  2. पंजाब

  3. मेघालय

  4. मिझोराम