नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. हा देश नव्या बदलासाठी तयार असल्याचं गुजरात आणि हिमाचलच्या निकालातून दिसत असल्याचं मोदी म्हणाले.


गुजरात आणि हिमाचलच्या विजयानंतर भाजपच्या दिल्ली मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक मंत्र्यांसह पत्रकार परिषद घेण्यात आली. मोदी आणि अमित शाहांनी गुजरात आणि हिमाचलच्या जनतेचे मनापासून आभार मानले.

गुजरातचा विजय हा आनंद द्विगुणित करणारा : मोदी

''गुजरातमध्ये भाजपने मिळवलेला हा अभूतपूर्व विजय आनंद द्विगुणित करणारा आहे. भाजपची सत्ता आल्याचा तर आनंद आहेच, मात्र गेल्या साडे तीन वर्षांपासून म्हणजे मी जेव्हा गुजरात सोडलं, तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य समर्थपणे सांभाळलं असल्याचा आनंद होत आहे'', असं मोदी म्हणाले.

''भाजपचा पराभव करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले. काँग्रेसने जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातच्या जनतेने हे नियोजन यशस्वी होऊ दिलं नाही. जनतेने आणखी जागरुक होण्याची गरज आहे'', असंही मोदी म्हणाले.

... पण विकासाच्या मध्ये येऊ नका : मोदी

''देशात नेहमी निवडणुका होतात, प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने लढवली जाते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात विकासाचं वातावरण निर्माण झालं आहे. सरकारचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे, कुणाला भाजप पसंत असेल किंवा नसेल, पण विकासाच्या मध्ये येऊ नका. भाजपचा जेव्हा पराभव होईल, तेव्ह महिनाभर जल्लोष साजरा करा, यामुळे देशाचं नुकसान होणार नाही'', असं आवाहनही मोदींनी केलं.

गुजरातचा विजय असामान्य : मोदी

गुजरातमध्ये भाजपला एकदा तरी पाडावं यासाठी संपूर्ण ताकद लावण्यात आली होती. मात्र गुजरातच्या जनतेने हे होऊ दिलं नाही. जातीयवादाचं विष पेरण्यात आलं, ज्याला गुजरातने नाकारलं. गुजरातचा विजय हा आपल्यासाठी असामान्य आहे, असं मोदी म्हणाले.

मोदींचं भाषण :