मुंबई: 500 आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर, देशभरातील एटीएमबाहेर रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे नोटा बदलून घेण्यासाठीही बँकांबाहेरही गर्दी आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी मर्यादा असल्याने आणि 500-हजाराच्या नोटा नसल्यामुळे, गेल्या काही दिवसात एटीएम बाहेर मोठ्या रांगा होत्या.
मात्र देशातील एटीएमची संख्या किती आहे? कोणत्या राज्यात सर्वाधिक एटीएम आहेत? शहरात किती, ग्रामीण भागात किती एटीएम? याबाबतच्या प्रश्नांचा हा आढावा- www.abpmajha.in देशात एकूण किती ATM आहेत?    - 2 लाख 15 हजार 39 देशात सर्वात जास्त एटीएम कोणत्या बँकेचे?
बँक एटीएमची संख्या
SBI 49 हजार 669
ICICI 14 हजार 73
AXIS 12 हजार 871
HDFC 12 हजार 13
  देशात कोणत्या भागात किती एटीएम?
महानगर शहरी भाग निम शहरी ग्रामीण   एकूण
५५९६० ६०३०१ ५८४३३ ४०३४५ २,१५, ०३९
www.abpmajha.in महाराष्ट्रात एकूण किती ATMs आहेत?    - 24 हजार 829 महाराष्ट्रात सर्वात जास्त एटीएम कोणत्या बँकेचे?
बँक एटीएमची संख्या
SBI 4 हजार 222
ICICI 2 हजार 703
AXIS 1 हजार 909
HDFC 2  हजार 13
  देशात सर्वाधिक एटीएम महाराष्ट्रात आहेत, त्या खालोखाल तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकचा नंबर लागतो. www.abpmajha.in सर्वात कमी एटीएम (154) मिझोरम राज्यात आहेत. देशाची राजधानी दिल्लीत 9  हजार 70 एटीएम आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये 11 हजार 625 एटीएम आहेत.
महाराष्ट्र तामिळनाडू उत्तरप्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल
२४,८२९ २३,७२८ १९,१४३ १६,९२९ ११,६८०
(स्त्रोत – आरबीआय, जून २०१६)