नवी दिल्ली : नोटाबंदीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा भावूक झाले. दिल्लीतील भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांशी बोलताना मोदी भावनिक झाले. याआधी गोव्यामधील भाषणातही मोदी भावूक झाले होते.


काळा पैशांना आळा घालण्यासाठी पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला सर्जिकल स्ट्राईक म्हटलं जात आहे.

फक्त 50 दिवस सहन करा, काळ्या पैशावर हल्लाबोल तीव्र : मोदी


 

परंतु नोटाबंदीला सर्जिकल स्ट्राईक म्हणू नका, असं आवाहन करत हा निर्णय जनतेच्या हितासाठी घेतल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. या निर्णयाचे फायदे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम व्हायला हवं, असं मोदींनी खासदारांना सांगितलं.