नवी दिल्ली: नकली नोटा बनवून त्या बाजारात आणल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र आता बनावट चलनी नाणीही बाजारात आणली जात आहेत.
दिल्ली पोलिसांनी नकली नाणी बनवणाऱ्या फॅक्ट्रीचा पर्दाफाश केला आहे. क्राईम ब्रांचने छापा मारुन 10 रुपयांची बनावट पण हुबेहुब नाणी बनवणाऱ्या मशीन आणि नाणी जप्त केल्या आहेत.
याप्रकरणातील मास्टरमाईंड स्वीकार लूथरा आणि उपकार लूथरा यांचा शोध पोलिस घेत आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या फॅक्ट्रीला पोलिसांनी टाळं ठोकलं आहे.
दहा रुपयाचं खरं -खोटं नाणे कसं ओळखायचं?
*खऱ्या नाण्यावर रुपयाचं ₹ हे चिन्हं असतं
*खोट्या नाण्यावर केवळ 10 लिहिलेलं असतं
*खऱ्या नाण्यावरील ₹ या चिन्हावर 10 उभ्या रेषा असतात.
*खोट्या नाण्यावर त्या 10 पेक्षा जास्त सुमारे 15 रेषा दिसतात.
*खऱ्या नाण्यावर भारत आणि India हे एकाच बाजूवरील अशोकस्तंभाच्या दोन्ही बाजूला लिहिलं आहे.
*खोट्या नाण्यावर ते वर एकत्र लिहिलं आहे.