मुंबई : केरळमध्ये सध्या निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. गेल्या 100 वर्षातील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळसाठी स्टार इंडिया आणि स्टार प्रवाहने मदतीचा हात पुढे केला आहे. केरळमधील सध्याची पूरपरिस्थित पाहता मदतीची रक्कम 2 कोटींवरुन 5 कोटी इतकी करण्यात आली आहे. स्टार इंडिया आणि 21st Century Fox यांच्या पुढाकारातून हा मदतनिधी उभारण्यात आला आहे. स्टार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर के माधवन (MD-South, Star India) यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे नुकताच 5 कोटींचा मदतनिधी सुपूर्द केला.
हा मदतनिधी उभारण्यासाठी #AllForKerala हे कॅम्पेन राबवण्यात आलं होतं. स्टार इंडियाच्या हॉटस्टार आणि वेगवेगळ्या 50 वाहिन्यांमधली जवळपास 60 कलाकारांनी या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता. स्टार प्रवाहच्या कलाकारांनीही या कॅम्पेनच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जनतेला आवाहन केलं.
केरळमधील पूरग्रस्तांना मदत करणं हे मी आमचं कर्तव्य समजतो. स्टारसारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करुन पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आम्ही जनतेला आवाहन केलं, आणि याला सर्वच स्तरातून साथ मिळाल्याची भावना उदयशंकर (President 21st Century Fox-Asia, and Chairman and CEO President 21st Century Fox-Asia, and Chairman and CEO-Star India) यांनी व्यक्त केली.
तर स्टार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर के माधवन (MD-South, Star India) म्हणाले की, केरळमधील सध्याची परिस्थीती खूपच चिंताजनक आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी जितकी मदत करणं शक्य आहे तितकी स्टार इंडियाच्या माध्यमातून केली जाईल.
स्टार इंडिया समूहाकडून केरळमधील पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2018 04:23 PM (IST)
हा मदतनिधी उभारण्यासाठी #AllForKerala हे कॅम्पेन राबवण्यात आलं होतं. स्टार इंडियाच्या हॉटस्टार आणि वेगवेगळ्या 50 वाहिन्यांमधली जवळपास 60 कलाकारांनी या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -