तिरुअनंतपूरम: महापुरामुळे केरळ अक्षरश: उद्ध्वस्त झालं आहे. केरळला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या मदतीचा ओघ सुरु झाला असला, तरी राज्याचं झालेलं नुकसान हे खूप मोठं आहे. नुकसानीचा हा आकडा तब्बल 20 हजार कोटींच्या घरात आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया अर्थात ‘असोचेम’ने हा अंदाज वर्तवला आहे.

महत्त्वाचं म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं मोठं नुकसान झालं आहे.

जवळपास एक लाख गायी, 1लाख शेळ्या, 1 लाख डुकरं आणि 4 लाखांवर कोंबड्या पुरात वाहून गेल्याची भीती आहे.  जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना या महापुराचा फटका बसला आहे. 14 जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार एकरवरील पीकं, फळबागा नष्ट झाल्या आहेत.

Kerala Flood: शाहरुख, जॅकलिन, प्रभास, कमल हसन, केरळला कोणाची किती मदत?

सर्वात जास्त नुकसान भातशेतीचं झालं आहे. जवळपास 45 हजार एकरवरील भातपीक नष्ट झालं आहे. तर 23 हजार एकरवरील साबुकंद (साबुदाणा) पीक, दीड हजार एकरावरील भात रोपवाटिका, 17 हजार 700 एकरवर नारळबागा, 1300 एकरवर नारळबागा तर 10 हजार एकरवरील भाजीपाला पीक हातचं गेलं.

यासोबतच रबर, मिरी, विलायची अशा पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान 1 हजार कोटींवर असेल असा प्राथमिक अंदाज आहे.

केरळनं तामिळनाडू कर्नाटक आणि काही प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून फळं, भाज्या खरेदी करायला सुरुवात केली आहे. त्यातून सुरुवातीच्या दिवसात तात्पुरता दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जातेय.

या महापुराचे दीर्घकालीन परिणाम केरळ राज्याच्या ग्रामीण भागावर होणार आहेत, ही हानी भरुन निघायला पैशासोबतच योग्य नियोजनाची गरज लागणार आहे.

महापुरात झालेलं नुकसान

1 लाख गायी

1लाख शेळ्या

1 लाख डुकरं

4लाख कोंबड्या

14 जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार एकरवरील पीकं, फळबागा नष्ट

45 हजार एकरवरील भातपीक नष्ट

23 हजार एकरवरील साबुकंद (साबुदाणा) पीक वाया

दीड हजार एकरावरील भात रोपवाटिका उद्ध्वस्त

17 हजार 700 एकरवर नारळबागांचा सूपडासाफ

10 हजार एकरवरील भाजीपाला पीक हातचं गेलं

शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान जवळपास 1 हजार कोटींवर

संबंधित बातम्या

उद्ध्वस्त केरळला यूएईकडून 700 कोटींची मदत  

Kerala Flood: शाहरुख, जॅकलिन, प्रभास, कमल हसन, केरळला कोणाची किती मदत?  

उद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचं सावट