Miss Trans Global 2021 : केरळच्या श्रुती सिताराला (Sruthy Sithara) बुधवारी 'मिस ट्रान्स ग्लोबल 2021' हा किताब देण्यात आला आहे. श्रुतीला 1 डिसेंबर रोजी केरळमधील वायकोम येथे तिच्या मूळ गावी एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान हा पुरस्कार मिळाला. हे विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. 


श्रुती सितारा म्हणाली,"कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लंडनमध्ये होणारा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पण हा पुरस्कार मिळाल्याचा मला नक्कीच अभिमान आहे". श्रुती सिताराने हा पुरस्कार तिच्या दिवंगत आईला समर्पित केला आहे. 


सिताराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांचे आभार मानत लिहिले आहे,"मला खात्री आहे की माझी आई आणि केरळची पहिली ट्रान्सजेंडर आरजे अनन्या कुमारी अॅलेक्सचा आज शरीराने माझ्यासोबत नसल्या तरी दोघीही या क्षणाचे साक्षीदार आहेत. या यशस्वी प्रवासाचे साक्षीदार असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार."





25 वर्षीय श्रुती सितारा  केरळ सरकारच्या न्याय विभागात काम करते. सिताराने मुकुट घातलेले फोटोदेखील शेअर केले आहेत. त्या फोटोंवर सिताराने लिहिले आहे, तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल, तर ध्येय निश्चित करा". मिस ट्रान्स ग्लोबल स्पर्धा जगभरातील ट्रान्सजेंडर आणि एलजीबी समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या


Miss Universe Harnaaz Sandhu : 21 वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, किताब जिंकल्यानंतर मिस युनिवर्स हरनाझ संधू म्हणाली...


Miss universe 2021 : भारताची हरनाज संधू बनली विश्वसुंदरी, पटकावला 'मिस युनिवर्स'चा किताब


Miss universe 2021 : भारताची हरनाज संधू विश्वसुंदरी होण्याच्या शर्यतीत, जाणून घ्या कोण आहे हरनाझ...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha