श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनच्या (Nowgam Police Station Blast) परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटा आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 29 हुन अधिक लोक जखमी झाल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी श्रीनगरमधील (Srinagar) नौगाम पोलीस स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झाला, ज्यामुळे परिसरातील इमारतीचे मोठे नुकसान झाले असून इमारतीच्या काही भागांना आग लागली.

Continues below advertisement


प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री हा परिसर मोठ्या स्फोटाने हादरला, ज्यामुळे धुराचे लोट आणि ज्वाळा हवेत पसरल्या होत्या. स्फोटात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर श्रीनगरचे उपायुक्त अक्षय लाब्रू यांनी स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली. सध्या या संदर्भात अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे. मात्र दिल्लीती कार स्फोटानंतर श्रीनगर पुन्हा एकदा हादरले आहे.


Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंध?


नवी दिल्लीत झालेल्या कार स्फोटानंतर (Delhi Red Fort Bomb Blast) काही दिवसांतच ही घटना घडली, ज्याला केंद्राने दहशतवादी हल्ला म्हटले होते, ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. तर काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनच्या अलीकडेच उघड झालेल्या एका दहशतवादी मॉड्यूलचा सक्रियपणे तपास करत होते आणि अधिकाऱ्यांनी अद्याप त्या तपासाचा आजच्या स्फोटाशी अधिकृतपणे संबंध जोडला नसला तरी, वेळ आणि स्थान गंभीर चिंता निर्माण करते. अहवाल असे सूचित करतात की स्टेशन परिसरात जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेट आणि इतर साहित्यांसह पुरावे गोळा करण्याच्या ऑपरेशन दरम्यान, साहित्याचा अनपेक्षितपणे हा स्फोट झाला.


Nowgam Police Station Blast : जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट, 9 जणांचा मृत्यू


जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट झाला असून या पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेले अमोनियम नायट्रेट साठवले होते, ज्याची फॉरेन्सिक टीम तपासणी करत होती. या अमोनियम नायट्रेटमुळेच हा मोठा स्फोट झाला असल्याचा संशय आहे. दरम्यान, दिल्ली लाल किल्ला स्फोटाशी जम्मू आणि काश्मीरचा संबंध समोर आल्यानंतर, तेथे अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांची नौगाम पोलीस ठाण्याच्या आवारात चौकशी करण्यात येत होती. यादरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा (14 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. तपासणीसाठी परिसरात आणलेले अमोनियम नायट्रेट हे स्फोटाचे कारण असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप या स्फोटासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे तपासाअंती या स्फोटाचे सत्य समजू शकणार आहे .






आणखी वाचा