श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी घंटाघर परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
'आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,' असं आव्हान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारुख अब्दुल्ला यांनी 27 नोव्हेंबरला दिलं होतं.
त्यानंतर हे शिवसैनिक लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी गेले होते. मात्र ते तिरंगा फडकावण्याआधीच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना अटक केली.
आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा : फारुख अब्दुल्ला
"शिवसेना लाल चौकात तिरंगा फडकावणार आहे. यासाठी पक्षाचं एक विशेष पथ काश्मीरला रवाना झालं आहे," अशी माहिती शिवसेनेचे जम्मू प्रदेशाध्यक्ष डिंपी कोहली आणि सरचिटणी मनिष साहनी यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना कोठीबाग पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. अश्विनी गुप्ता, मुनीश गुप्ता, नागपाल चौधरी, राज सिंह, भुवन सिंह, संजीव सिंह, राजीव सलारिया, विकास आणि सोनी सिंह अशी ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांची नावं आहेत. हे सगळे जम्मूचे रहिवासी आहेत.
अब्दुल्लांच्या आव्हानाला शिवसेनेचं उत्तर, लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2017 01:34 PM (IST)
'आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,' असं आव्हान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारुख अब्दुल्ला यांनी 27 नोव्हेंबरला दिलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -