इंदूर (मध्य प्रदेश) : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. आज भय्यू महाराज डॉ. आयुषी यांच्याशी विवाहबद्ध झाले.

इंदूरला घरगुती सोहळ्यात हा विवाह संपन्न झाला.



तीन वर्षांपूर्वी भय्यू महाराज यांच्या वडिलांचं आणि 2 वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यू महाराज पुन्हा लग्नबंधनात अडकले.

महाराजांना कुहू नावाची 13 वर्षांची मुलगीही आहे. भय्यू महाराज यांचं वय अंदाजे 48 वर्षे आहे.

संबंधित बातमी : भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार