जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहडा परिसरात एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची त्याच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. मुश्ताक अहमद शेख असं हल्ल्यात मृत पावलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
या हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिस अधिकाऱ्यावरील हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिजबेहडा परिसरातील काटू वापजान गावातल्या मुश्ताक यांच्या घरात दहशतवादी घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांनी काल (गुरुवार) शोपियामध्ये लष्कराच्या तुकडीवर देखील हल्ला केला. पण सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.