लखनऊ: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी आता वादाचं टोक गाठलं आहे.
आझम खान यांनी भारतीय जवानांवर अप्रत्यक्षरित्या बलात्काराचे आरोप केले आहेत.
आझम खान म्हणाले, "काश्मीरमध्ये महिलांनी जवानांना चोपलं. इतकंच नाही तर महिलांनी जवानांची गुप्तांगं कापली. बलात्काराच्या घटनांमुळे बदला घेण्यासाठी महिला दहशतवादी जवानांची गुप्तांगं कापत आहेत. अशा घटना या संपूर्ण भारतासाठी लाजिरवाणी बाब आहे. जगात तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही".
दहशतवादी जवानांचे हात-पाय तोडत नाहीत, त्यांना त्यांच्या शिराचीही अडचण नव्हती. तक्रार होती तो 'पार्ट' त्यांनी कापला असंही आझम खान बरळले.
इतंकच नाही तर आसाम आणि झारखंडमध्येही महिलांनी जवानांना मारहाण केली आहे. त्यामुळे मोदींच्या राज्यात देशाची वाटचाल भयावह आहे. देश बॅलेट ऐवजी बुलेटचा मार्ग अवलंबत आहे. त्याचा परिणाम सर्व देश भोगत आहे, असंही आझम खान म्हणाले.
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते. त्यावेळी काही जवानांची गुप्तांगं कापल्याचं समोर आलं होतं. त्याचाच आधार घेत आझम खान यांनी हे वक्तव्य केलं.
https://twitter.com/ANINewsUP/status/879964656206364672