नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांनी थोड्या वेळापूर्वीच राष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माकप नेते सीताराम येच्चूरी, अशोक चव्हाण, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे देखील उपस्थित होते.


दरम्यान, एनडीएकडून रामनाथ कोविंद यांनी आधीच अर्ज दाखल केला आहे. जवळपास कोविंदांचं राष्ट्रपती होणं निश्चित असलं, तरी विरोधकांनी मीरा कुमार यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

एनडीएच्या दलित चेहऱ्याच्या खेळीनंतर काँग्रेसनंही दलित बड्या नेत्या म्हणून मीरा कुमारांच्या नावाला पसंती दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.