नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या अध्यक्षा मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी पोटनिवडणुका स्वतंत्र लढवू असा निर्णय बसपा अध्यक्षा मायावतींनी जाहीर केल आहे. तर दुसरीकडे आम्हला मते मिळाली असून समाजवादी पक्ष नसता तर बहुजन समाज पक्षाला 0 जागा मिळाल्या असत्या असं म्हणत समाजवादी पक्षाने मायावतींवर पलटवार केला आहे.


लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी होऊनही सपाचे पारंपरिक मतदार असणाऱ्या यादवांनी आम्हाला मतं दिली नाहीत असा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. दरम्यान, अखिलेश यांनी स्वतःच्या पक्षात आणि भूमिकेत योग्य ते बदल केल्यास पुढच्या निवडणुकीत पुन्हा आघाडी होऊ शकते, असंही त्यांनी बोलून दाखवलंय.

Mayawati | सपा-बसपा आघाडी होऊनही यादवांनी मतं न दिल्याचा मायावतींचा आरोप | लखनौ | ABP Majha



तर पोटनिवडणुकीत आघाडी झाली नाही तर समाजवादी पार्टी निवडणुकीची तयारी करेल असं मतं समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी व्यक्त केलं आहे. तसेच समाजवादी पार्टी सुद्धा स्वबळावर 11 जागांवर पोटनिवडणूक लढेल असे अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. मायावतींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अखिलेश यादव यांनी मतं मांडले आहे.

उत्तर प्रदेशातील एकमकांचे कट्टर विरोधक लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. पण मोदींसमोर सपा-बसपा आघाडीचा झाला.