गांधीनगर: गुजरातमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार सत्तेत येण्याचा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएसने आज सर्वात मोठा एक्झिट पोल जाहीर केला. गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.

दक्षिण गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपला 35 जागांपैकी 24, तर काँग्रेसला 11 जागा मिळण्याची चिन्हं आहेत.

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा असून 92 हा बहुमताचा आकडा आहे.

दक्षिण गुजरातमध्ये कोणत्या पक्षाला मतांची किती टक्केवारी?

दक्षिण गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपला 52 टक्के, काँग्रेसला 40 टक्के, तर इतरांना 8 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण गुजरातमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?

दक्षिण गुजरातमध्ये भाजपला 21 ते 27, काँग्रेसला 9 ते 13, तर इतरांना 0 किंवा 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपला सरासरी 24, काँग्रेसला 11 जागा मिळण्याची चिन्हं आहेत. इतर किंवा अपक्षांना दक्षिण गुजरातमध्ये खातं उघडता येणार नसल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

भाजप काँग्रेसपेक्षा खूपच पुढे आहे, मात्र 2012 मधील विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत भाजपला चार जागांवर नुकसान झाल्याचं दिसत आहे. सुरतमधील व्यापाऱ्यांच्या नाराजीचा निकालावर परिणाम होण्याची चिन्हं आहेत.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 14 जिल्ह्यांमधील 93 जागांचं मतदान झालं. गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. यापूर्वी गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं.

दक्षिण गुजरातचा कौल कुणाला?

दक्षिण गुजरातमध्ये एकूण जागा - 35 जागा आहेत.

भाजप 52 टक्के, काँग्रेस 40 टक्के आणि इतर 8 टक्के मतांचा अंदाज

भाजप 24, काँग्रेस 11 आणि इतर 0 जागांचा अंदाज

#ABPExitPoll – गुजरातचा एक्झिट पोल एकूण जागा 182


    • भाजप - 117





    • काँग्रेस – 64




  • अन्य – 1




गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल. गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे सुपरफास्ट निकाल तुम्ही 18 तारखेला एबीपी माझावर पाहू शकाल.

संबंधित बातम्या


गुजरातचा सर्वात मोठा एक्झिट पोल


गुजरातचा एक्झिट पोल: सौराष्ट्र-कच्छचा कौल कुणाला?


गुजरातचा एक्झिट पोल: सौराष्ट्र-कच्छचा कौल कुणाला?


गुजरातचा एक्झिट पोल: दक्षिण गुजरातचा कौल कुणाला?


गुजरातचा एक्झिट पोल: मध्य गुजरातचा कौल कुणाला?


गुजरातचा एक्झिट पोल: उत्तर गुजरातमध्ये भाजप मोठा पक्ष


हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत, चाणक्यचा एक्झिट पोल