नवी दिल्ली : रिझर्व बँकेनं 5 महिन्यापूर्वीच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याच्या बातम्या पसरत आहे. मात्र 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झालेली नाही, तर कमी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दुसरीकडे 500 च्या नोटांची छपाई अधिक प्रमाणात सुरु आहे.200 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच बाजारात आणण्याचा प्रयत्न रिझर्व बँकेचा आहे. त्यासाठी 2 हजारांच्या नोटांची छपाई कमी झाल्याचं बोललं जातंय.
‘हिंदुस्थान टाईम्स' आणि ‘द क्विंट'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. या वृत्तानुसार, सरकारने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर, रिझर्व बँकेने पाच महिन्यांपूर्वीच त्याची छपाई बंद केली होती. पण छपाई पूर्णपणे बंद करण्यात आली नसून, त्याचं प्रमाण कमी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागणीनुसारच 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात येत असल्याचं सूत्रांनी दिली. तर 200 रुपयांच्या नोटांबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात येत नाही आहे.
संबंधित बातम्या
रिझर्व बँकेकडून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद
आरबीआय लवकरच 200 रुपयांची नोट आणणार?
200 रुपयांची नोट कशी असेल? सोशल मीडियावर फोटो व्हायरल !
2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद नाही, सूत्रांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2017 12:28 PM (IST)
रिझर्व बँकेनं 5 महिन्यापूर्वीच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याच्या बातम्या पसरत आहे. मात्र 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झालेली नाही, तर कमी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -