इंदापूर (रायगड) : देशातील पहिली जलदगती एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गावरील मुंबई ते गोवा दरम्यान धावणार आहे. जलदगती 'हमसफर एक्स्प्रेस' सुरु करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील इंदापूरमधील भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.


कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील हॉल्ट स्थानकाचे आज क्रॉसिंग स्थानकात रुपांतर करण्यात आले. यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कोकणात पहिल्यांदाच रेल्वेचा कारखाना भूमिपूजन करण्यात येणार असून यांच्यामार्फत स्थानिक मालाची विक्री संपूर्ण देशात करता येणार असून यामुळे  स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी म्हटले.

लवकरच कोकण रेल्वेमार्गावर देशातील पहिली जलदगती एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा दरम्यान धावणार असून, तिला 'हमसफर एक्स्प्रेस' म्हणुन ओळखण्यात येणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.

स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून इंदापूर येथील क्रॉसिंग स्थानकामुळे पंचक्रोशीतील रहिवाशांसोबतच कोकण रेल्वेचा लाभ कोकणवासीयांनाच होणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी म्हटले. तर रायगड जिल्ह्यातील पेण-अलिबाग रेल्वेमार्ग, अलिबाग-मुंबई रेल्वे प्रवासी वाहतूक, खारापटी आणि लाखपाले येथील ग्रामस्थांच्या मागणी संदर्भातील मागणीकडे देखील अनंत गीते यांनी सुरेश प्रभू यांचे लक्ष वेधले. लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे गीते यांनी सांगितले.