नवी दिल्ली: भारतीय लोकशाहीची अंधाराच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे, असा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलत होते.
एनडीटीव्हीवर केलेल्या कारवाईवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
"सरकारविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचं तोंड बंद करण्याचा डाव मोदी सरकारने घातला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीची अंधाराच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे" असं राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसच्या बैठकीला सोनिया गांधींची अनुपस्थिती
दरम्यान काँग्रेसने संसदेच्या हिवाळी अधिवेशानाआधी पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची धुरा राहुल गांधींनी सांभाळली.प्रकृती अस्वस्थ्यामुळे सोनिया गांधी सभेला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे कार्यकारिणीचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या राहुल गांधींनी यावेळी मोदी सरकारचा जोरदार समाचार घेतला.