जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2016 10:34 AM (IST)
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये रात्री दोनच्या सुमारास नॉर्थ गेटपासून 50 मीटर अंतरावर एक काळी बॅग असल्याचं सुरक्षरक्षकाच्या निदर्शनास आलं. या बॅगमध्ये 7.56 ची देशी पिस्तुल, 7 काडतुसं आणि 1 स्क्रू ड्रायव्हर सापडला. यानंतर जेएनयूच्या कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात आर्म्स अक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.