Sonia Gandhi in Bharat Jodo Yatra : सध्या देशाच्या राजकारणात (Indian Politics) एका विषयाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे, काँग्रेसचा (Congress) नवा अध्यक्ष आणि तोही गांधी परिवाराव्यतिरिक्त. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) यांना उमेदवारी दिल्यानं पक्षात खळबळ उडाली आहे. यासर्व घडामोडींसह सध्या देशभरात सुरु असलेली राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा'ही (Bharat Jodo Yatra) चर्चेत आहे. सध्या ही यात्रा कर्नाटकात असून आज या पदयात्रेत सोनिया गांधी सहभागी होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. कित्येक दिवसांनी सोनिया गांधी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 


केरळपासून कर्नाटकपर्यंतची राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रा सध्या चर्चेचा विषय आहे. या यात्रेबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत. अनेकजण या यात्रेचं स्वागत करत आहेत. तर कहीजण यात्रेवरुन गांधी कुटुंबीय आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चार दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. 4 सप्टेंबर रोजी सोनिया गांधी कर्नाटकात पोहोचल्यात. अशातच आज त्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. चार दिवसांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सामील होतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यात्रेत सहभागी झाल्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणखी भर पडणार असल्याचं बोललं जात आहे. 


सकाळी 8 वाजता सोनिया गांधी राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. सोनिया गांधी सकाळी 8  वाजता मंड्या जिल्ह्यातील जक्कनहल्ली येथून पदयात्रेत सामील होणार असल्याचं कळतंय. एवंढच नाहीतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भारत जोडो पदयात्रेत सामील होणार असून राहुल गांधी यांच्यासोबत काही अंतर पायी चालणार असल्याचीही माहिती मिळत आहे.  


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन काही अंतर कार्यकर्त्यांसोबत चालणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच वाढणार आहे. आपल्या अध्यक्षांनी भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन पदयात्रा केल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पक्षाप्रति निष्ठाही वाढल्याचं दिसून येऊ शकतं, असं काँग्रेसच्या सूत्रांचं म्हणणं आहे. 


प्रवास सुरू असताना सोनिया परदेशात गेल्या


विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी कन्याकुमारी ते कश्मीर अशा भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. त्यावेळी सोनिया गांधी देशात नव्हत्या. त्या वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या भारतात परत आल्या आहेत. अशातच, परदेशातून परतल्यानंतर त्या पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेसोबत पदयात्रा करणार आहेत.