नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाच प्रकरणात गोत्यात आलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधानांना उत्तर दिलं आहे. मी शेवटचा श्वास भारतातच घेईन असं सोनिया गांधींनी केरळमधील एका सभेत म्हटलं.
'भारताविषयी माझ्या मनात असलेलं प्रेम आणि समर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हिसकावू शकत नाहीत. भारतच माझं घर आहे आणि मी इथेच अखेरचा श्वास घेईन. माझ्या मृत्यूनंतर राखही इथल्याच जमिनीत मिसळेल, कारण इथल्या जनतेवर माझं प्रेम आहे.' असं प्रत्युत्तर सोनियांनी दिलं.
हेलिकॉप्टर घोटाळा, नॅशनल हेराल्ड प्रकरण, रॉबर्ट वड्रा जमिन प्रकरणात गांधी कुटुंब सध्या भाजप आणि नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर आहे. केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी सोनिया गांधींवर हल्लाबोल केला आहे.