नवी दिल्ली : ''देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता. त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या 'चले जाव' चळवळीलाही विरोध केला होता,'' अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला. त्या लोकसभेत बोलत होत्या.
स्वातंत्र चळवळीतील महत्त्वाचा भाग असणाऱ्या 'चले जाव' चळवळीला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त लोकसभेत विशेष सत्राचे आयोजन केलं होतं. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव न घेता टीका केली.
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, पारतंत्र्याच्या काळात अशा अनेक संघटना आणि व्यक्ती होत्या. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी होऊन, योगदान दिलं नाही. अशा संघटनांनी स्वातंत्र्य चळवळीचा विरोधच केला. पण आज तेच स्वातंत्र्याच्या गोष्टी बोलत आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नसणाऱ्यांचं राज्य : सोनिया गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2017 06:07 PM (IST)
''देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता. त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या 'चले जाव' चळवळीलाही विरोध केला होता,'' अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला. त्या लोकसभेत बोलत होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -