नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहाल तुरुगांत जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. त्याआधी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनीही पी चिदंबरम यांची भेट घेतली. 'आयएनएक्स मीडिया' प्रकरणी पी. चिदंबरम यांना 21 ऑगस्टला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची 5 सप्टेंबरला तिहार तुरुगांत रवानगी करण्यात आली.


दिल्लीतील न्यायालयाने चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी 19 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. पी. चिदंबरम यांच्यावरून भाजप सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. त्यानंतर काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी चिदंबरम यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.





काँग्रेस पी. चिदंबरम यांच्या पाठीशी उभी असल्याचा संदेश देण्यासाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि गुलाम नबी आझाद यांनीही काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगात जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती. भाजपने चिदंबरम यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.



मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी पी चिदंबरम यांची भेट घेतल्याबद्दल आणि पाठबळ दिल्याबद्दल कार्ती चिदंबरम यांनी त्यांचे आभार मानले. या राजकीय लढाई यामुळे आम्हाला ताकद मिळेल, असंही त्यांनी म्हटलं.