जयहिंदपूरमचा असलेला हा तरुण केस गळतीमुळे तणावाखाली होता. केस गळती थांबवण्यासाठी त्याने अनेक उपाय केले. अनेक औषधं घेतली, तेलाचा वापर केला, पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
बंगळुरुमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत तो काम करत होता. मृत तरुणाच्या डोक्याच्या टाळूमध्ये इन्फेक्शन होतं. त्यामुळे त्याचे केस गळत होते, असं पोलिसांनी सांगितलं.
मिथुनने आपल्या करिअरची सुरुवात चेन्नईमधील इन्फोसिस कंपनीतून केली होती. तिथे काही वर्ष काम केल्यानंतर मागील वर्षीच तो बंगळुरुतील कंपनीत रुजू झाला होता. त्याचे वडील रवि यांचा मृत्यू काही वर्षांपूर्वीच झाला होता. मिथुनच्या पश्चात आता आई वसंती असून ती जयहिंदपूरममध्ये राहते.
पोलिसांनी सांगितलं की, मिथुनची आई मुलाच्या लग्नासाठी मुलगीही शोधत होती. पण केस गळत असल्यामुळे तो अतिशय तणावात होता.
मागील काही आठवड्यांपासून तो सुट्टीवर होता आणि तणावाखाली होती. या अडचणीबाबत त्याने अनेक वेळा आईलाही सांगितलं होतं. सर्व काही ठीक होईल, असा दिलासा आई वारंवार देत होती.
रविवारी मिथुनची आई मंदिरात गेली होती. परत आल्यानतंर मुलगा पंख्याला लटकल्याचं तिने पाहिलं. शेजारच्यांच्या मदतीने तिने मुलाला खाली उतरवून आणि रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.