नवी दिल्लीः वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, सदानंद गौडा आणि राजीव प्रताप रुडी यांचं केंद्रीय कॅबिनेट कमिटीचं सदस्यत्व काढून घेण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट समितीमध्येही मोठे फेरबदल केले आहेत.
मंत्रीमंडळ फेरबदलांमध्ये स्मृती इराणींच मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता कॅबिनेट समिचीचं सदस्यत्वही काढून घेण्यात आलं. त्यामुळे स्मृती इराणींना हा मोठा धक्का मानावा लागेल.
सदानंद गौडा यांची कौशल्य विकास मंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांचंही समितीचं सदस्यत्व काढून घेण्यात आलं आहे. मनुष्यबळ विकास मंत्रीपद स्वीकारणाऱ्या प्रकाश जावडेकरांचं समितीचं सदस्यत्व कायम ठेवण्यात आलं आहे.