VIDEO: अंगावर येणारी रेल्वे आणि धडकी भरवणारा स्टंट
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2016 08:31 AM (IST)
लखनऊ: मुंबईच्या लोकल प्रवासातली स्टंटबाजी अनेकांच्या अंगावर शहारे आणते., मात्र मुंबईतल्या स्टंटबाजीपेक्षाही धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातल्या गाजियाबादच्या मसुरीतील स्टंटबाजीचा हा व्हिडीओ आहे. रेल्वेच्या पुलावर चढून काही अल्पवयीन मुलं रेल्वेची वाट बघतात. रेल्वे अगदी काही सेकंद लांब असताना पुलावरुन खाली उडी टाकतात. एका स्थानिक रहिवाशानं ही स्टंटबाजी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, मुलं कोण आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. VIDEO: