Smriti Irani On Congress Allegations : काँग्रेसच्या (Congress) आरोपाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. माझी मुलगी शिकतेय, बार नाही चालवत, असे प्रत्युत्तर स्मृती इराणी यांनी दिलेय. काँग्रेसनं स्मृती इराणीची मुलगी गोव्यात बार चालवत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला स्मृती इराणी यांनी शनिवारी पुरव्यानिशी प्रत्युत्तर दिले. स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना 2024 मध्ये पुन्हा एकदा माझ्याविरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा दिलाय.
दोन प्रौढ नेत्यांनी 18 वर्षीय मुलीच्या इज्जत आणि सन्मानाला ठेच पोहचवण्याचं काम केलेय. ज्या 18 वर्षीय मुलीवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, त्या मुलीचा दोष हा फक्त हाच आहे की ती स्मृती इराणीची मुलगी आहे. स्मृती इराणी (Smriti Irani) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेत असते म्हणून मुलीला काँग्रेसकडून टार्गेट केले जातेय.
त्या मुलीचा दोष इतकाच आहे की, तिच्या आईने 2014 आणि 2019 मध्ये अमेठीमधून राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पत्रकार परिषदेत स्मृती इराणी भावूक झाल्या होत्या. त्यांनी यावेळी काही कागदपत्रांचा हवालाही दिला. तसेच त्या 18 वर्षीय मुलाचा दोष इतकाच आहे की, तिच्या आईने 2019 च्या निवडणूकीत राहुल गांधींचा पराभव केला होता, असे स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. माझी मुलगी शिक्षण घेतेय, बार नाही चालवत. माझ्या मुलीवरील आरोप निंदनीय आहेत. या प्रकरणी कोर्टामध्ये जाणार असल्याचेही स्मृती इराणी यांनी सांगितलं.
काय आहेत आरोप?
काँग्रेस नेत्यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीवर गंभीर आरोप लावलेत. स्मृती इरणीची मुलगी गोव्यात बनावट लायसन्सवर बार चालवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी काँग्रसने स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.