मुंबई: नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार सोहळा आज पार पडला. यात तब्बल 19 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यानंतर तात्काळ खातेवाटपही जाहीर करण्यात आलं. या खातेवाटपात सर्वात मोठा बदल म्हणजे स्मृती इराणी यांच्याकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आलं असून त्यांच्या जागी प्रकाश जावडेकर यांची वर्णी लागली.


 

नव्या मंत्र्याच्या शपथविधीनंतर मंगळवारी रात्री 9:30 च्या दरम्यान, खातेवाटप जाहीर झालं. यामध्ये स्मृती इराणी यांच्याकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. तर आजच कॅबिनेटपदी प्रमोशन झालेल्या प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा भार सोपवण्यात आला आहे.
याचसोबत सदानंद गौडा यांच्याकडून कायदे मंत्रालय काढून घेण्यात आलं असून त्यांना सांख्यिकी आणि नियोजन मंत्रालय देण्यात आलं आहे. गौडा यांचं  रविशंकर प्रसाद कायदे मंत्रायल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.