मुंबई : मुस्लिम बांधवांचा सण ईद-उल-फित्र बुधवार 6 जुलै ऐवजी 7 तारखेला साजरा होणार आहे. आज चंद्र न दिसल्यामुळे दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी ही घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, भोपाळमध्येही याबाबत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार ऐवजी गुरुवारी 7 तारखेला ईद साजरी करण्यात येईल.
दिल्लीत केंद्रीय कर्मचाऱ्यांची ईद-उल-फित्रची सुट्टीही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. तर संबंधित राज्य सरकारांच्या निर्णयानुसार त्या-त्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सुट्टी ठरवावी अशी मुभा देण्यात आली आहे.