smart mother timetable : बदलत्या काळानुसार आईसुद्धा खूप स्मार्ट होत आहे. असं म्हटलं जातं की, संपूर्ण कुटुंबासाठी एक स्त्री शिक्षित होणं खूप गरजेचं आहे. अशाच एका आईच्या कामगिरीचं उदाहरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या मुलांशी कसं वागावं हे प्रत्येकालाच माहित आहे. पण यानंतरही मुलं खूप हट्टी आणि खोडकर होतात. पण आता आम्ही ज्या आईबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, त्या आईची शैली प्रत्येकजण फॉलो करत आहे.
सध्या सोशल मिडीयावर एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत एका लहान मुलीचे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे संपूर्ण टाईम टेबल दिसत आहे. पण, गंमत म्हणजे या मुलीशी आईनेही टाईम टेबलवर एक करार (agreement) केला आहे. हा असा अप्रतिम करार आहे की ज्यामुळे मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लागतील.
या फोटोत तुम्ही बघू शकता की, मुलीला कधी उठायचे आहे, केव्हा नाश्ता करायचा आहे, केव्हा आंघोळ करायची आहे, कधी अभ्यास करायचा आहे, कधी खेळायचे आहे आणि कधी झोपायचे आहे, या सर्व गोष्टी वेळेनुसार नमूद केल्या आहेत. याबरोबरच आईने टाईम टेबलवर मुलीला लहानपणापासून सौजन्यपूर्ण बनवण्यासाठी असं लिहून ठेवलं आहे की, जर तिने संपूर्ण दिवस न रडता, न ओरडता, न तोडफोड करता दिवस घालवला तर तिला 10 रुपये मिळतील. इतकंच नाही तर तिने हे रूटीन सतत सात दिवस 100 रूपये मिळतील. असा हा करार आहे.
आपल्या मुलीसाठी आईने आखलेल्या या अनोख्या शैलीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. आईचा हा ट्रेंड प्रत्येकाच्या पसंतीस पडून तो फॉलो केला जातोय. हे वेळापत्रक शेअर करताना आईने लिहिले, 'मी आणि माझ्या सहा वर्षांच्या मुलीने आज एक करार केला आहे, जो तिच्या दैनंदिन वेळापत्रकावर आणि परफॉर्मन्स लिंक्स बोनसवर आधारित आहे.'
महत्वाच्या बातम्या :
- Weather Update: देशाच्या राजधानीत दाट धुके; उत्तर भारतात पावसाची शक्यता, महाबळेश्वरचा पारा 5 अंशावर
- किचन बजेट आटोक्यात राहणार? खाद्य तेलाच्या किंमतीवर नियंत्रणासाठी सरकारने उचलले पाऊल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha